Breaking

Local Body Elections : भाजप राबवतेय संविधान सन्मान अभियान !

BJP’s Samvidhan Sanman Campaign ahead of local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी

Nagpur ‘भाजप सत्तेत आले तर संविधान बदलणार’ असा प्रचार करून इंडिया आघाडीने एनडीएला लोकसभा निवडणुकीत धक्का दिला होता. चारशेपारचे स्वप्न बघणाऱ्या एनडीएला पावणेतीनशे जागा जिंकताना दम लागला. महाराष्ट्रात तर या मुद्यावर महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. पण भाजपच्या डोक्यातून लोकसभेतील अपयश गेलेले नाही. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी संविधान बचाव अभियानातून भाजपने तयारी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने देशभरात ११ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान संविधान गौरव अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी ही माहिती दिली. लोकसभा निवडणूकीच्यावेळी विरोधकांकडून भाजप संविधानविरोधी असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. पण राज्यात सत्ता आल्यावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवर फोकस करण्यात आले आहे. लोकसभेतील नॅरेटिव्हला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचेच दिसून येत आहे.

Pankaja Munde On DCM Ajit Pawar : अजितदादांचं काम बघून भारावल्या पंकजाताई !

लोकसभेत भाजपला संविधानविरोधी असल्याच्या मविआच्या प्रचाराचा मोठा फटका बसला होता. भाजप संविधानात बदल करेल असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. जनमानसात निर्माण झालेली प्रतिमा बदलविण्यासाठी भाजपने हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील याबाबत सूचना केली होती. भारताचे संविधान सर्वोत्कृष्ट संविधान आहे. त्याचा गौरव सर्वांनी केला पाहिजे. भाजप संविधान विरोधी असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये विरोधी पक्षांनी पसरविला आहे. त्यामुळे अभियानात खरी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

Governor C.P. Radhakrishnan : विद्यापीठातून शिकवला जावा ‘पर्यावरण संवर्धन!

या मोहीमेदरम्यान दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात तज्ज्ञांचे व्याख्यान तसेच विविध प्रवर्गातील मान्यवरांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच तरुण पिढीपर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचविण्यावर भर असेल. यावेळी माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सतीश श्रीवासन, ॲड. राहुल झामरे, महेंद्र प्रधान, पवन तिवारी उपस्थित होते.