Pragya Rajiv Satav : स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला !

Chance of entry soon; Signs of a big setback for Congress : लवकरच प्रवेशाची शक्यता; काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हे

Mumbai: काँग्रेसचे दिवंगत नेते आणि हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी, विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रज्ञा सातव लवकरच अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि दुर्लक्षामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती, त्यातूनच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. २०२१ साली त्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या पुन्हा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत.

Shindes criticis : मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल

दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशावर काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा फेटाळून लावली आहे. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली असून त्या असा निर्णय घेतील असे वाटत नाही, ही बातमी निराधार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष त्यांच्या संपर्कात असून त्यांनी असे पाऊल उचलू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Municipal Corporation Elections : एकत्र लढायचे की नाही? युतीवरून भाजपात गोंधळाची स्थिती

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे मोजके खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. पंचायत समिती सदस्यापासून खासदार, राज्यसभा सदस्य, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता.

Health Department : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रँकिंगमध्ये बुलढाणा पाचवा; ‘सीएस’ विभागाची कामगिरी चिंतेची

कोरोना महामारीत २०२१ मध्ये राजीव सातव यांचे अकाली निधन झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतर काँग्रेसची ताकद हळूहळू कमी होत गेल्याचे चित्र दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश झाला, तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. गांधी कुटुंबाशी जवळीक असलेल्या सातव कुटुंबातील नेतृत्व भाजपमध्ये गेल्यास राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रत्यक्षात काय घडते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

____