Bomb Threat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

Akola Collectorate receives bomb threat E-mail : कथित आयएसआयच्या नावाने आलेल्या ई-मेलमुळे खळबळ

Akola अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाल्याने आज, गुरुवार, दि. १८ डिसेंबरला खळबळ उडाली. सदर ई-मेल कथितरीत्या आयएसआयच्या नावाने पाठविण्यात आल्याचे समोर आले असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात येत असून, इमारतीसह आजूबाजूच्या परिसरात दक्षता वाढविण्यात आली आहे.

Prakash Shinde : ‘त्या’ ड्रग्सप्रकरणावरून राजकारण तापलं; प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले

कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ परिसरात प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

Ministers wicket : कोकाटेंनंतर आता आणखी एका मंत्र्याची ‘विकेट’ पडणार?

दरम्यान, हा ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला, त्यामागचा उद्देश काय आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.