Elections yet to declere, Vanchit started distribution of nomination forms : इच्छुकांना उमेदवारी अर्जांचे होतेय वितरण
Akola जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासकांची नियुक्ती होऊन दोन दिवसही झाले नाहीत. पण जिल्हा परिषदेत सत्ताधारी राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यास सुरुवातही केली आहे. त्यासाठी १८ जानेवारीपर्यंतची मुदतदेखील दिली आहे. परिपूर्ण अर्ज पक्षाकडे सादर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना तोंड फुटल्याचे दिसत आहे.
अकोला जिल्हा परिषद व अधिनस्त सात पंचायत समित्यांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पाच वर्षांचा काळ का पूर्ण झाल्याने व राज्यशासनाकडून मुदत वाढ मिळाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचा प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीवर गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Wardha MIDC Mahayuti Government : वर्धा एमआयडीसीची सूत्रं नागपूरकडे !
ही प्रक्रिया पूर्ण होऊन दोन दिवसही उलटले नाहीत. तोच वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत हे अर्ज पक्षाकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचीही धावपळ होत.
ही घाई कशासाठी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप घोषित झाल्या नाहीत. कधी होतील, याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. असे असतानाही वंचितकडून अवघ्या दोन दिवसांत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरून घेतले जात आहेत. ही घाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
MLA Manoj Kayande : चोखामेळांच्या जन्मोत्सवात रंगला राजकीय आखाडा !
युती, आघाडीपासून लांब
वंचित बहुजन आघाडीने राज्यात सुरू असलेल्या युती आघाडीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने तयारी सुरू केली आहे.
सत्ता टिकविण्याचे आव्हान
जिल्हा परिषद आणि काही पंचायत समितीवर सत्ता आहे. पण ग्रामीण भागात मोठा प्रभाव पडू शकला नाही. त्यामुळे येत्या काळात युती आघाडीच्या राजकारणापासून लांब राहून वंचित बहुजन आघाडी सत्ता टिकविण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.