Resignation of Dabang IPS officer finally accepted : अकोल्याचे सुपुत्र आता उतरणार राजकीय आखाड्यात
Akola विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेले शिवदीप बिहार राज्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. बिहारमध्ये त्यांना सिंघम म्हणूनच ओळखलं जायचं. त्यांच्या कारकीर्दीची बिहार सरकारनं दखल घेतली होती. त्यानंतर लांडे यांना पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. आयजी झाल्यानंतर काही काळपर्यंत लांडे महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पोलिस दलातील सेवेचा राजीनामा दिला. आता त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.
गृहमंत्रालयानं लांडे यांची सेवा 13 जानेवारी 2025 पासून समाप्त झाल्याची घोषणा केली आहे. पोलीस दलातून बाहेर पडल्यानंतर लांडे यांनी आता बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या परिवारासह ते बिहारमध्ये वास्तव्य करणार आहेत. शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. अनेक महिन्यांपर्यंत सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. बिहार सरकारनं लांडे यांनी राजीनामा देऊ नये, असा आग्रह धरला होता.
Amravati Municipal corporation : आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय मिळत नाहीत दाखले !
पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर नेत्यांपर्यंत अनेकांनी लांडे यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती. मात्र लांडे राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळं बिहार सरकारनं राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडं पाठविला होता. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने सरकारने त्यांची सेवा समाप्त झाल्याचे जाहीर केले आहे.
राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी
शिवदीप लांडे हे अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील मूळ रहिवासी आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर भाऊसुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यांचे सासरे शिवसेनेचे उपनेते राहिलेले आहेत. या राजकीय पार्श्वभूमीमुळे आता शिवदीप लांडे सुद्धा राजकारणात नवी इनिंग खेळण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे.
Local Body Elections : निवडणुकीची घोषणा नाही, पण वंचितला लगीनघाई !
राजकारणातही ‘दबंग’ ठरणार का?
राजीनामा दिल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये शिवदीप लांडे यांनी राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र समाजकारण करीत राहणार असल्याचे ते म्हणाले होते. आता मात्र त्यांच्या राजकारणातील प्रवेश याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या नव्या राजकीय कारकीर्दीबाबत बिहारमध्ये चर्चा आहे. ते राजकारणातही दबंग ठरणार का, याबाबत उत्सुकता आहे.