Benefits will stop if e-KYC is not done by December 31, 2025 : 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभ थांबणार
Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यात राबवली जात असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबवली जात असून सध्या राज्यातील कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
योजनेचा लाभ फक्त पात्र आणि योग्य लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी शासनाने सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेमुळे बनावट, अपात्र किंवा दुहेरी नोंद असलेल्या लाभार्थ्यांची छाननी केली जाणार आहे. सुरुवातीला ई-केवायसीसाठी देण्यात आलेली मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्याप 30 ते 40 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे निर्धारित मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Local Body Elections : देऊळगाव राजा नगरपरिषद अध्यक्षपदी माधुरी शिपणे
सध्या राज्यात सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र लाभार्थींचा शोध घेतला जात असून 31 डिसेंबर 2025 नंतर ई-केवायसी पूर्ण नसलेल्या महिलांचे मासिक 1500 रुपयांचे अनुदान थांबवले जाऊ शकते, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Local Body Elections : जळगाव जामोद नगराध्यक्षपदी भाजपची सरशी
महिला व बालविकास विभागाने लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते.








