Breaking

Ravikant Tupkar : सिंचन विहीरीच्या मंजुरीसाठी पैसे मागणाऱ्यांना झोडपून काढा !

Don’t leave those asking for money for approval of irrigation wells : रविकांत तुपकरांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

Buldhana चिखली पंचायत समितीतील सिंचन विहीर घाेटाळ्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी १६ जानेवारी राेजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आंदाेलन करून जाब विचारला. तसेच याेजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करणाऱ्यास जागेवरच झाेडपून काढा, असे आवाहन शेकतकऱ्यांना केले.

चिखली पंचायत समितीमधील सिंचन विहीर व इतर लाभांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक हाेत आहे. शेतकऱ्यांवरील या अन्यायाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडून जाब विचारला.

Bharosa cell : संसाराची विस्कटलेली घडी सुरळीत होतेय!

तत्पूर्वी तालुक्यातील एकसुद्धा विहीर मंजूर न झालेल्या भोरसा-भोरसी, तेल्हारा, पेठ, आमखेड, गोदरी, पांढरदेव यांसह दिवठाणा व इतर गावांतील शेतकर्‍यांनी तुपकरांची भेट घेतली. सिंचन विहीर मंजुरासाठी होत असलेली आर्थिक लूट, पिळवणूक व गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला. यापृष्ठभूमीवर तुपकरांनी विनायक सरनाईक, नितिन राजपूत व शेतकऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांची भेट घेतली. चिखली पंचायत समिती विहीर, गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देण्यात यावी. ज्या गावांमध्ये सिंचन विहीर झाली नाही. अशा गावांतील प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी, रखडलेले घरकुल अनुदान (हप्ते) वाटप करण्यात यावे.

Nagpur Police CM Devendra Fadnavis : नागपूरचा ‘खुफिया’ विभाग करतोय तिकीट विक्री !

त्याचप्रमाणे शेतकर्‍यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी तुपकरांनी केली. दरम्यान गटविकास अधिकारी पायघन कशा प्रकारे तोंड बघून काम करीत आहेत. याचा पाढा पुराव्यासह खरात यांच्यासमोर शेतकर्‍यांनी वाचला. तर मनमानी कारभार न करता शेतकरी हिताच्या दृष्टीने काम करणाऱ्या गटविकास अधिकार्‍याला चिखलीचा प्रभार देण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली. दरम्यान शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही. आर्थिक लूट करणार्‍यांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने त्यांनी आंदाेलन मागे घेतले.