Breaking

Randhir Sawarkar, Ranjit Patil : सावरकर विरुद्ध पाटील, भाजपमध्ये शीतयुद्ध कायम!

अकोला

Cold war continues in Akola BJP : महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार परिणाम

Amravati विभागीय पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेवरील सदस्य असताना डॉ. रणजीत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते. तेव्हापासून अकोला Akola भाजपमध्ये सावरकर-धोत्रे विरुद्ध पाटील गट असे शीतयुद्ध सुरू झाले होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या शीतयुद्धाने कळस गाठला होता. त्याचे पर्यावसन रणजीत पाटील यांच्या पराभवात झाले. त्यानंतरही हे शीतयुद्ध सुरूच असून त्याचा प्रभाव जिल्ह्याच्या राजकारणावर दिसून येत आहे.

भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन गटात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या दोन गटातील वाद उफाळून आला होता. डॉ. रणजीत पाटील यांच्या गटातील कोणत्याही उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी मिळू नये त्यासाठी आमदार सावरकर यांच्या गटाने प्रयत्न केले. त्यामुळे डॉ. रणजीत पाटील यांच्या गटातील डॉ. अशोक ओळंबे यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती.

प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करीत त्यांनी उमेदवारी दाखल करून रोष व्यक्त केला होता. अकोट विधानसभा मतदारसंघातही पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न झाले. स्वतः डॉ. रणजीत पाटील यांनाही उमेदवारी मिळू नये म्हणून सावरकर गटाने केलेले प्रयत्न सर्वज्ञात आहे. या राजकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. विधानसभा निवडणुकीनंतरही या दोन गटातील शीतयुद्धावर पडदा पडलेला नाही.

पाटील गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत रणजीत पाटील यांच्या गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न आमदार सावरकर यांच्या गटातून केला जात आहे. त्यासाठी सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या बैठक सत्रांमध्ये पाटील गटाचा कोणताही कार्यकर्ता उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

अकोट मतदारसंघावर फोकस
डॉ.रणजीत पाटील सध्या सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांनी अकोट मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या निकटवर्तीयांना उमेदवारी कशी मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.