व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amravati Municipal Corporation Election : काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर आरोप

Amravati Municipal Corporation Election : काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर आरोप

BJP faces allegation of giving tickets to congress leaders : एबी फॉर्म वाटपावरून घमासान; प्रभाग ११ व १२ मध्ये गोंधळ

Amravati महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. भाजपशी दीर्घकाळ कोणताही संबंध नसलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करत निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजापेठ झोन-२ कार्यालय परिसरात भाजप निष्ठावंतांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना घेराव घालून जाब विचारला.

भाजपने प्रभाग क्रमांक ११ (रुक्मिणीनगर–फ्रेजरपुरा) आणि प्रभाग क्रमांक १२ (स्वामी विवेकानंद कॉलनी) येथे तिकीट वाटप करताना ‘आयारामां’ना प्राधान्य दिल्याचा आरोप कालीमाता संस्थानचे शक्ती महाराज यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणारे, हिंदुत्वाला कमी लेखणारे लोक भाजपमध्ये कसे काय स्वीकारले जातात, असा सवाल संगम गुप्ता यांनी उपस्थित केला.

Akola Municipal Corporation Elections : आईसाठी उमेदवारी मागितली, नंतर घेतला मोठा निर्णय

या वेळी भाजपचे महापालिका निवडणूक निरीक्षक जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि दिनेश सूर्यवंशी यांना निष्ठावंतांनी घेराव घालून ‘एबी फॉर्म आयारामांना कसे दिले?’ असा थेट प्रश्न विचारला. आंदोलनात शक्ती महाराज, संगम गुप्ता, राखी गुप्ता आदी कार्यकर्ते आघाडीवर होते.

मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून भाजप इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले. मात्र, अनेक इच्छुकांना भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या निवासस्थानी दारातच ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. ‘भिकाऱ्यासारखी वागणूक दिली गेली,’ असा संताप निष्ठावंतांनी व्यक्त केला.

भाजप नेते, मंत्री तसेच एबी फॉर्म वाटपाची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांना निष्ठावंतांनी जाब विचारला. ‘आम्ही कुठे कमी पडलो? पक्ष वाढवला, आंदोलनं केली, प्रसंगी कारागृहात गेलो; तरीही उमेदवारी बाहेरच्यांना दिली जाते,’ असा आरोप संगम गुप्ता यांनी केला.

निष्ठावंतांच्या डोळ्यांत अश्रू
उमेदवारी नाकारल्याने काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘आमच्या रक्तात भाजप असताना काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट देण्यात आले. उमेदवारी विकली गेली,’ असा आरोपही यावेळी करण्यात आला. सचिन डाके यांनीही पक्षासाठी केलेल्या त्यागाचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली.

Amravati Municipal Corporation Election : कोण माघार घेणार, कोण पुढे जाणार; फैसला आज!

तासभर ‘हायव्होल्टेज ड्रामा’
राजापेठ झोन कार्यालय ते भाजप कार्यालयापर्यंत सुमारे तासभर निष्ठावंतांचा आक्रोश वजा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू होता. धक्काबुकी, शिवीगाळ तसेच पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचे आरोप करण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

error: Content is protected !!