Thackeray group Fails to Find a Candidate Against Kirit Somaiya’s Son : विरोधकांची अप्रत्यक्ष माघार, विजयाचा मार्ग करताहेत सोपा
Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या प्रभागातून भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना उमेदवारी दिली. अर्ज दाखल झाल्यानंतर झालेल्या छाननीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांनी या प्रभागात उमेदवार दिला नाही. काँग्रेसने ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली होती, मात्र त्यांचा उमेदवारही प्रभावी ठरला नाही.
या घडामोडीमुळे महायुतीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मुलुंडसारख्या महत्त्वाच्या प्रभागात विरोधकांनी उमेदवार न दिल्याने भाजपला मोठा फायदा झाला आहे. नील सोमय्या यांना थेट वॉकओव्हर मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरेंचे कट्टर शत्रू मानले जातात. कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा त्यांनी वाचला होता. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्लाही केला होता. त्यांच्या एका प्रायव्हेट व्हिडिओने सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली होती. तसेच किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळू नये म्हणून युतीत असताना ठाकरेंनी रान उठवलं होतं. मात्र इतके शत्रुत्व असूनही ठाकरेंच्या नील सोमय्या यांच्या विरोधात उमेदवार उभा न केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Nagpur Municipal Corporation Elections : अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, खोलीत डांबून ठेवले
किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या २०१७ मध्ये मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता, ते भाजपच्या तिकिटावर त्याच वॉर्डमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रभाग १०७ मधून कोणताही उमेदवार उभा केला नाही कारण त्यांनी ही जागा शरद पवारांच्या पक्षासाठी सोडली होती. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हंसराज दानानी यांना वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी दिली होती, दानानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. कारण त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर केले नव्हते. या परिस्थितीत, किरीट सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तरी त्यांना वंचित बहुजन आघाडी आणि ९ अपक्ष उमेदवारांशी लढा द्यावा लागणार आहे.
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा
मुंबईतील वॉर्ड १०७ मध्ये नील सोमय्या यांचा राजकीय मार्ग सोपा होत असल्याचे पाहून किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “गॉड इज ग्रेट.” हा ठाकरेंना टोमणा असल्याचे म्हटले जात आहे. नील सोमय्या हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे नाव आहे. त्यांच्या वडिलांनी, किरीट सोमय्यांनी, मुंबईत आणि विशेषतः उत्तर-पूर्व मुंबईत दीर्घकाळ राजकारण केले आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये सोमय्या कुटुंबाचा प्रभाव मोठा आहे. भाजपने या पार्श्वभूमीचा फायदा घेत नील सोमय्या यांना उमेदवारी दिली होती. आता विरोधकांचा उमेदवार बाद झाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.








