Divisional Commissioner of Amravati : विभागीय आयुक्तांचे पथक धडकले जिल्हा परिषदेत

A team of Divisional Commissioners inspected various departments of Zilla Parishad : नऊ जणांनी केली तपासणी; २१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांचे निरीक्षण

Amravati जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील आस्थापना विषयक बाबी आणि योजनांची उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील नऊ जणांचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहे. या पथकाने विविध विभागांच्या प्रशासकीय दस्ताऐवजांची झाडाझडती सुरू केली आहे.

या तपासणी दरम्यान जिल्हा परिषदेच्या सभेचे कामकाज. सामान्य प्रशासन विभागाकडून भरण्यात आलेली रिक्त पदे. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली कार्यवाही. तसेच कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक तपासले जात आहे. योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे का, हेदेखील बघितले जात आहे.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 पुन्हा दावोसमध्ये

तपासणीसाठी नियुक्त पथकामध्ये यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि अकोला येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. या पथकाद्वारे आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता, समाजकल्याण, पाणीपुरवठा, शिक्षण, जलसंधारण, वित्त, बांधकाम आणि पंचायत विभागांची सखोल तपासणी केली जात आहे.

कुठे काय तपासले?
आरोग्य विभाग : औषध व लस भांडार, कुटुंब कल्याण कार्यक्रम, लसीकरणाचा आढावा, साथीच्या आजारांवरील उपाययोजना.
महिला व बालकल्याण : विविध योजना, महिला दक्षता समितीची कार्यक्षमता, जिल्हा परिषदेचा सेस फंड वापर.
स्वच्छता विभाग : स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा अभियान, सार्वजनिक शौचालये, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन.
यासोबतच इतर विभागांतील प्रशासकीय आणि आर्थिक बाबींची तपासणी २१ जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार ‘लालपरी’ खरेदी करणार!

तपासणी पथकाची रचना
जिल्हा परिषदेत नियुक्त तपासणी पथकाचे नेतृत्व यवतमाळ जिल्हा परिषदेचे सहायक प्रशासन अधिकारी पी. जी. बिरे करत आहेत. पथकात खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. प्रकाश नांदे (वाशिम), व्ही. व्ही. शेळके (बुलढाणा), मनोज जाधव (वाशिम), एस. वाय. बडगे (अकोला), एस. व्ही. चिकटे (यवतमाळ), श्रीकांत माने (कारंजा, वाशिम), एम. आर. गवते (बुलढाणा), एम. एच. पुनसे (अकोट) यांचा यामध्ये समावेश आहे.