Akola Municipal Corporation election : विकास मंचला इतर पक्षांच्या नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा

Unconditional support from councillors of other parties for Vikas Manch : भाजप–एमआयएम युतीचा प्रश्नच नाही – आमदार प्रकाश भारसाकळे

Akola भाजप आणि एमआयएम यांची विचारधारा पूर्णपणे वेगळी असून, एमआयएमसोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, विकास कामांच्या उद्देशाने इतर पक्षांच्या नगरसेवकांनी अकोट शहर विकास मंचला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट मत भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अकोट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदी माया धुळे यांच्यासह ११ नगरसेवक विजयी झाले होते. विकास कामांच्या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) येथील नगरसेवक भाजपसोबत आले. त्यानंतर नगरपरिषदेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी ‘अकोट शहर विकास मंच’ची स्थापना करण्यात आली.

या विकास मंचमध्ये भाजप, अजित पवार गट, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांचा समावेश असून, एकूण २१ सदस्यांचे बहुमत तयार झाले आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या नगरसेवकांना घेण्याचा प्रश्नच नव्हता, असेही भारसाकळे यांनी स्पष्ट केले.

100 crore scam : मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने अंतर्गत महावितरणमध्ये 100 कोटींचा घोटाळा !

दरम्यान, एमआयएममधील दोन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत विकास मंचकडे आले. विशेष म्हणजे एमआयएमकडून विजयी झालेल्या नगरसेवकांपैकी एकजण पूर्वी भाजपचा बूथ प्रमुख होता. त्याच्या विनंतीवरून त्या भागात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून कामेही करण्यात आली होती. मात्र, त्याने एमआयएमची उमेदवारी घेऊन निवडणूक जिंकली. विकासाच्या मुद्द्यावर तो आणि आणखी एक नगरसेवक अकोट शहर विकास मंचमध्ये सहभागी झाले.

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

“मी कोणत्याही नगरसेवकाला विकास मंचमध्ये येण्यासाठी संपर्क केला नाही. विकास कामांसाठी इतर पक्षांचे नगरसेवक स्वयंस्फूर्तीने, बिनशर्त विकास मंचमध्ये आले आहेत. भाजप आणि एमआयएमची विचारधारा वेगळी असल्याने युतीचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे आमदार भारसाकळे यांनी ठामपणे सांगितले. तसेच, अकोट नगरपालिकेतील युतीबाबत माध्यमांनी अनावश्यक गोंधळ निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला.