Deulgao Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम; उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी

Opposition left ineffective before the invincible NCP–BJP alliance : राष्ट्रवादी-भाजपच्या अभेद्य युतीपुढे विरोधक निष्प्रभ; स्वीकृत सदस्यपदी रामभाऊ रामाने व गोविंद तिडके यांची वर्णी

Deulgao Raja पश्चिम विदर्भातील राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या देऊळगाव राजा नगर परिषदेवर महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मंगळवारी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. वनिता राजेश भुतडा यांनी उपाध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. याच प्रक्रियेत गोविंद गजानन तिडके आणि ॲड. रामभाऊ बाबुराव रामाने यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या विजयामुळे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची पालिकेतील सत्ता आता अधिक भक्कम झाली आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील दोन माजी आमदारांच्या राजकीय प्रतिष्ठेमुळे देऊळगाव राजाची ही निवडणूक राज्यासाठी चर्चेचा विषय ठरली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीत अंतर्गत बंडाळी आणि राजकीय कुरघोडींचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. मात्र, ऐनवेळी महायुतीने आपली रणनीती यशस्वीपणे राबवली. नगराध्यक्षपदी माधुरी सिपणे आधीच विजयी झाल्या असून, आज झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वनिता भुतडा यांना १४ मते मिळाली. त्यांनी अकोट विकास आघाडीचे उमेदवार शेख अनवर यांचा पराभव केला.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या अलीची गुजरात येथे अखिल भारतीय सागरी जलतरणात झेप

नगर परिषदेतील संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ९ आणि भाजपचे ३ असे एकूण १२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, शिवसेना (UBT) गटाच्या २ नगरसेवकांनी अनपेक्षितपणे महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ १४ वर पोहोचले. त्यामुळे विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. दुसरीकडे नगर विकास आघाडीचे पारडे ७ मतांवरच स्थिरावले. स्वीकृत नगरसेवक निवडीमध्येही तौलनिक संख्याबळानुसार शहर विकास आघाडीकडून गोविंद तिडके, तर नगर विकास आघाडीकडून रामभाऊ रामाने यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Buldhana Municipal Council : भाजपचा राजीनामा दिलेले नेते शिंदेंच्या गळाला, शिवसेनेची पालिकेवर निर्विवाद सत्ता

पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष माधुरी सिपणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडीची घोषणा होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या अतिषबाजीत जल्लोष साजरा केला. या विजयामुळे आगामी ५ वर्षांसाठी देऊळगाव राजा नगर परिषदेच्या विकासाची सूत्रे आता पूर्णपणे महायुतीच्या हाती एकवटली असून, विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.