The Deputy Chairperson may be the Chairperson of the Panchayat Samiti : २० जानेवारीला निवडणूक; राजकीय वातावरण तापले
Deori Elections : पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवरीतील राजकीय वातावरण तापले आहे. सभापती कोण होणार, याबद्दल अनेक चर्चा झाल्या. अजूनही यासंदर्भात वेगवेगळ्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती यांच्याच नावावर सभापतीपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
पंचायत समिती सभापतीची निवडणूक सोमवार, दि. २० जानेवारीला होणार आहे. ‘सर्वसाधारण पुरुष’ असे आरक्षण आहेत. त्यामुळे विद्यमान उपसभापती अनिल बिसेन यांची सभापतीपदी वर्णी निश्चित मानली जात आहे. येथील पंचायत समितीत एकूण १० सदस्य आहेत. भाजपचे ६ तर काँग्रेस चे ४ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता भाजपची असली तरी काँग्रेसच्या चार सदस्यांनी बिसेन यांना मतदान केले तरी आश्चर्य वाटणार नाही.
SP Nagpur Rural : पोलीस अधिक्षकांच्या सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून घेतली !
पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक २० जानेवारीला होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर निवडणुकी दरम्यान कुठलाही दगा फटका होवू नये, यासाठी भाजपने सदस्यांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. हे सदस्य सध्या पर्यटनावर गेले आहेत. देवरी पंचायत समितीत भाजपला बहुमत आहे. त्यामुळे सभापती हा भाजपचा होणार, यात शंका नाही. पंचायत समितीचे १९ वे सभापती म्हणून अनिल बिसेन यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचेही सांगतिले जात आहे.
अडीच वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत निघाली. सहाही पंचायत समितींमध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले होते. नंतर महिला प्रवर्गासाठी चिठ्ठी टाकण्यात आली होती. त्यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देवरी पंचायत समितीचे आरक्षण देण्यात आले होते. सर्वसाधारण (महिला) आरक्षण असल्याने भाजपच्या अंबिका बंजार यांची सभापतीपदी वर्णी लागली होती. तर उपसभापतीपदी अनिल बीसेन यांची वर्णी लागली होती.
Sudhir Mungantiwar : लाडक्या बहीणींच्या तक्रारीची सुधीर मुनगंटीवार यांनी लगेच घेतली दखल !
बिसेन यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ घालवला. यात त्यांनी मनरेगा अंतर्गत देवरी पंचायत समिती मध्ये १८० कोटीची कामे केली आहेत. तर ६ हजार गुरांचे गोठे निर्माण करणारी महाराष्ट्रातील एकमेव पंचायत समिती आहे. गोटाबोडी येथील पंचायत समिती सदस्य झाले. त्यानंतर उपसभापतीपदी झाले. त्यानंतर बिसेन यांनी संपूर्ण देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविली.