BMC Election 2026 : मुंबई गेली, आता कोकणही जाणार? या कुटुंबाने सोडली ठाकरेंची साथ

Konkan leader also parts ways with Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कुठलाही संबंध नसल्याचे केले जाहीर

Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ मधील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भाजप धुरंदर ठरला आहे. निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच काय तर त्यांचा अभेद्द असा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका सुद्धा ढासळला आहे. आता त्यांना कोकणातही धक्के बसायला सुरुवात झाली आहे.

चिपळूण तालुक्यातील समीर टाकळे कुटुंबाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजकीय सहभाग पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना स्थानिक राजकीय वर्तुळात आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत मोठ्या धक्का म्हणून पाहिली जात आहे. समीर टाकळे हे चिपळूण नगरपालिकेच्या राजकारणात एक अत्यंत प्रभावी आणि जुने नाव मानले जातात. ते माजी उपशहरप्रमुख आणि चिपळूण अर्बन बँकेचे संचालक होते आणि त्यांनी विविध काळात शिवसेना पक्षासाठी मोठे योगदान दिले होते.

Nagpur municipal corporation election : मंत्री जयस्वालांनी आग्रह केला, उमेदवार पडला

समीर टाकळे यांच्यासह त्यांच्या कन्या डॉ. सानिका टाकळे यांनीही शिवसेना (ठाकरे गट) सोडल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे चिपळूणमध्ये पक्षाची संघटनात्मक स्थिती आता अधिक कमजोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर भाष्य करताना टाळके यांनी स्पष्ट केले की, यापुढे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाशी आपला कोणताही संबंध राहणार नाही.

Nagpur municipal corporation election : विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही पराभूत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

समीर टाकळे कुटुंबाने शिवसेना (ठाकरे गट) सोडण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे. त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी या पक्षासाठी केलेल्या कार्यामुळे चिपळूण परिसरात शिवसेना या गटाला शक्ती प्राप्त झाली होती, पण त्यांनी पक्ष सोडल्यामुळे ही शक्ती आता नव्या दिशेकडे वळण्याची शक्यता आहे.