Election Commission : एका महिन्यात खर्च सादर करा, अन्यथा कारवाई!

Candidates to face action if expenses are not filed within a month : चारच दिवस शिल्लक; उमेदवारांमध्ये धाकधूक, ‘अनऑफिशिअल’ खर्चाचा हिशेब नाही?

Buldhana नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणूक खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान झाले, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. त्यामुळे खर्च सादर करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून, अनेक उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले तसेच पराभूत झालेले, दोन्ही प्रकारचे उमेदवार खर्च सादर करण्याच्या नियमांतर्गत येतात. निर्धारित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येतात. अशा उमेदवारांवर पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यावर बंदी येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ladki bahan Yojana : पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर; महामार्ग रोखून संताप व्यक्त !

जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. प्रचारादरम्यान प्रचार साहित्य, भेटवस्तू वितरण, सोशल मीडियावरील जाहिराती तसेच ‘कंपनी अथवा वैयक्तिक मदतीतून’ झालेला खर्च अनेक वेळा अधिकृत हिशेबात दाखविला जात नसल्याची चर्चा आहे. हा खर्च अनौपचारिक मानला जात असला तरी खर्च मर्यादा ओलांडल्यास उमेदवारांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिका निवडणुकीत प्रचार साहित्य (बॅनर, होर्डिंग, पोस्टर, फ्लेक्स), सोशल मीडिया जाहिरात, प्रचार रॅली, सभा, जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे गणवेश आदी बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी मतदारांना भेटवस्तू देण्यात आल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

Cabinet Decision : महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

खर्च मर्यादा काय?

‘अ’ वर्ग नगरपालिका :

नगराध्यक्ष – १५ लाख रुपये
सदस्य – ५ लाख रुपये

‘ब’ वर्ग नगरपालिका :

अध्यक्ष – ११.२५ लाख रुपये
सदस्य – ३.५ लाख रुपये

‘क’ वर्ग नगरपालिका :

अध्यक्ष – ७.५ लाख रुपये
सदस्य – २.५ लाख रुपये

स्वतंत्र बँक खाते अनिवार्य
नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक असून, सर्व आर्थिक व्यवहार त्याच खात्यातून करणे आवश्यक आहे. अनेक उमेदवारांनी खर्च सादर केला असला तरी काहींचा तपशील अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून स्मरणपत्रे दिली जात आहेत. खर्च सादरीकरणासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने नियमभंगाच्या भीतीने अनेक उमेदवार चिंतेत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.