Breaking

Anil Deshmukh : पालकमंत्री ठरवायला आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करणार का?

 

When will Guardian Ministers be appointed? : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा महायुती सरकारला चिमटा

Nagpur राज्यात अद्यापही पालकमंत्र्यांची नावे जाहीर न झाल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. नावे ठरविताना तिन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याची शंका व्यक्त होत आहे. एकमत होत नसल्यानेच मंत्र्यांची नावे निश्चित झालेली नाहीत, असेही बोलले जात आहे. अशात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.

अनिल देशमुख यांनीदेखील सरकारवर तोफ डागली आहे. आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री निश्चित करणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रिपदाची प्रतीक्षा लागली आहे. अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. अगोदर मुख्यमंत्रिपद, मग खातेवाटप व आता पालकमंत्रिपदासाठी राज्याला इतकी प्रतीक्षा करावी लागते आहे.

Nana Patole : मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच असुरक्षित

बहुमत मिळूनदेखील अशी स्थिती असल्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे की नाही? असा सवालच राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठवड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे घोषित होतील असा दावा केला होता. मात्र अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा दावा, आम्ही महायुती म्हणूनच लढणार !

आता यात परत तारीख पे तारीख असे चित्र निर्माण झाले आहे. १६ जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले होते व आता ते प्रजासत्ताकदिनाच्या अगोदर नावांची घोषणा होईल असे म्हणत आहेत. यावर अनिल देशमुख यांनी सरकारला चिमटे काढले आहेत. निवडणुकांचा निकाल लागून दोन महिने होत आले. सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी अजून पालकमंत्री पद वाटपाचा तिढा सुटलेला नाही. 20 तारखेला मुख्यमंत्री दावोसला (स्वित्झर्लंड) जाणार आहेत. बहुतेक तिथे आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा करून पालकमंत्री पद वाटपाचा तिढा सुटेल, असं दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.