Wadettiwar vs Dhanorkar : खासदार झाले म्हणून मालक ठरत नाहीत, इतिहास काढायला गेलं तर सगळंच बाहेर येईल!

Vijay Wadettiwar candid response to Pratibha Dhanokar criticism : प्रतिभा धानोकरांच्या टीकेला विजय वडेट्टीवारांचे जशास तसं प्रत्युत्तर

Chandrapur : चंद्रपूरमधील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येत असून खासदार प्रतिभा धानोकरांच्या वक्तव्यांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. खासदार झाले म्हणून कोणी पक्षाचा मालक ठरत नाही, नेते आणि खासदार दोघांचीही जबाबदारी सारखीच असते, संयम ठेवून काम करावं लागतं, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत धानोकरांवर तोफ डागली आहे.

प्रत्येक कार्यकर्त्याला मी आवडेलच असं नाही, मात्र माझ्या उमेदवारीला विरोध केला म्हणून तिकीट कापणे आणि कार्यकर्त्यांना बाजूला सारणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. वैचारिक मतभेद असू शकतात, पण जुना इतिहास काढायला गेलं तर अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला. बाळू धानोकर यांना काँग्रेसमध्ये आणण्याची भूमिका माझीच होती, त्यानंतर प्रतिभा धानोकर यांचा प्रवेश झाला, त्यामुळे मीच मालक आहे अशी भूमिका योग्य ठरत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Shivsena symbol controversy : शिवसेना चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता, सुनावणी पुढे ढकलली !

मागील 25 वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा मी सांभाळतो आहे, तर प्रतिभा धानोकर या अवघ्या सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या आहेत, असे सांगत जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या योगदानावर त्यांनी भर दिला. पक्ष जुने कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. नगरपरिषद निवडणुकीत जीव ओतून काम करण्यात आले, मात्र त्यावेळी खासदारांचा सहभाग नव्हता, असा थेट आरोपही त्यांनी केला.

महानगरपालिका निवडणुकीत आम्ही दोघांनी मिळून एबी फॉर्म वाटप केले, सहमतीने उमेदवार निश्चित झाले आणि 60 जागांवर उमेदवारी ठरली होती. मात्र वसंत पुरके यांनी सहा जागांवर उमेदवारी कापण्याचा आग्रह धरला आणि त्यातील फक्त दोन उमेदवार निवडून आले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

आमच्यात कोणताही वैयक्तिक वाद नाही, खासदारांचा गैरसमज झाला आहे, असे सांगत त्यांनी भांडणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. कुठल्याही नगरसेवकाला जबरदस्तीने बोलावले नाही, नगरसेवक स्वतःहून आमच्याकडे आले, असे स्पष्ट करत हायकमांडने प्रत्यक्ष येऊन नगरसेवकांना विचारावे, कोण कोणाला घेऊन गेले ते सगळे समोर येईल, असेही ते म्हणाले.

CM visit to Davos : दावोसला जाऊन मंत्र्याच्याच कंपनीसोबत करार?

 

दोन-चार नगरसेवक सोडले तर बहुतेक सर्व नगरसेवक माझ्याकडे येतील, असा दावा करत खासदारांनी काही नगरसेवकांना जबरदस्तीने गाडीत बसवून घरी नेल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. एकत्र बसून चंद्रपूरचा महापौर ठरवायचा आहे, निर्णय नगरसेवक घेतील, नेते नाहीत, असे ते म्हणाले. पक्ष सोडून जाण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण कार्यकर्ता जिवंत असेल तरच पक्ष जिवंत राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीपर्यंत हा विषय नेण्याची गरज नाही. सर्व नगरसेवकांना वन-टू-वन विचारून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. नेता हा पक्षाचा मालक नसतो. कोणी स्वतःला मालक समजत असेल तर त्याचा थोबाड कार्यकर्त्यांनी रंगवला पाहिजे, अशी खळबळजनक आणि संतप्त प्रतिक्रिया देत विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला नवे वळण दिले आहे. या वक्तव्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी सत्तास्थापनेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__