Amravati Mayor Battle : आरक्षण सोडतीनंतर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, अमरावती महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच

Reservation draw triggers keen contest between BJP and Congress : महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित, रवी राणा आणि बसपच्या भूमिकेकडे लक्ष

​Amravati अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदासाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत अमरावतीचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, सत्तेचा ४४ हा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​महापालिका निवडणुकीत २५ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४४ जागांपासून भाजप अजूनही दूर आहे.

Vijay Wadettiwar : नागपुरात शिवानी दाणींसाठीच आरक्षण काढले, वडेट्टीवारांचा आरोप

​भाजपकडे स्वतःचे २५ नगरसेवक आहेत. त्यांना आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या १५ आणि शिंदे गटाच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत युतीचे पारडे ४३ पर्यंत पोहोचते, मात्र बहुमतासाठी अजूनही एका मताची गरज आहे.

​प्रमुख दावेदार: भाजपमध्ये महापौरपदासाठी स्मिता सूर्यवंशी, सुरेखा लुंगारे, लविना हर्षे, स्वाती कुळकर्णी आणि पद्मजा कौंडण्य यांसारख्या महिला नेत्यांच्या नावांची जोरात चर्चा आहे.

​काँग्रेसकडे १५ नगरसेवकांचे संख्याबळ असून, भाजपने सत्ता स्थापन करू नये यासाठी काँग्रेसने इतर पक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखली आहे.​ काँग्रेस (१५), एमआयएम (१२), राष्ट्रवादी अजित पवार गट (११), बसप (३) आणि उबाठा-वंचित अशी मोट बांधल्यास हा आकडा ४४ च्या पार जाऊ शकतो.

Sudhir Mungantiwar : रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास इंगोले यांचे नाव चर्चेत असले, तरी महापौरपद ‘महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसला आता आपल्या विजयी नगरसेविकांमधून प्रबळ चेहरा द्यावा लागणार आहे.

​अमरावती महापालिकेत सत्तेची चावी आता बसपच्या ३ नगरसेवकांच्या हाती असल्याचे मानले जात आहे. भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज असताना बसप कोणाला साथ देते, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे. दुसरीकडे, आमदार रवी राणा यांनी भाजपचाच महापौर बसणार असल्याचा दावा केला असला, तरी पदवाटपावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.