Uddhav Balasaheb Thackeray : कोल्हापुरात ठाकरे गटाला खिंडार! ‘मातोश्री’शी निष्ठा असणारे शिवसैनिक शिंदेंच्या वाटेवर?

Thackeray camp leaders move to Eknath Shinde : काँग्रेससोबतच्या युतीचा फटका, स्थानिक नेतृत्वावर पराभवाचे खापर

Kolhapur पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर, ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, थेट ‘मातोश्री’शी कौटुंबिक संबंध असलेले काही निष्ठावंत कार्यकर्तेही आता पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने काँग्रेससोबत केलेली युती कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेली नाही. या निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. या युतीचा पक्षाला कोणताही फायदा झाला नाहीच, उलट शिवसेनेची हक्काची मते काँग्रेसच्या पदरात पडली, अशी भावना स्थानिक शिवसैनिकांमध्ये आहे. या राजकीय रणनीतीमुळे कट्टर शिवसैनिक स्वतःला डावलले गेल्याचे मानत असून, त्यातूनच आता शिंदे गटाकडे जाण्याचा ओढा वाढला आहे.

Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप

महानगरपालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी या पराभवासाठी थेट स्थानिक वरिष्ठ नेतृत्वाकडे बोट दाखवले आहे. उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, संपर्कप्रमुख विजय देवणे आणि शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत आणि त्यांना निर्णयप्रक्रियेतून बाहेर ठेवले जाते, असा आरोप करत अनेक नगरसेवक आता शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.

Chandrapur Congress : चंद्रपूरात काँग्रेसची अवस्था, ‘आधे उधर जावो, आधे इधर आओ’

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाभरातून मोठे शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रवेश घडवून आणण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आपले बळ वाढवण्यासाठी शिंदे गटाने कोल्हापूरच्या नाराज पदाधिकाऱ्यांसाठी लाल गालिचा अंथरला आहे. पुढील काही आठवड्यांत कोल्हापूर महापालिकेतील माजी नगरसेवकांचा एक मोठा गट अधिकृतपणे शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.