There is a stir everywhere in the shocking backdrop of the plane crash : विमान अपघाताच्या धक्कादायक पार्श्वभूमीवर सर्वत्र हळहळ
Mumbai: बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्य आणि देशाच्या राजकारणाच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रभाव टाकणाऱ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास आणि कारकीर्द चर्चेत आहे.
अजित अनंतराव पवार यांनी बारामतीतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. सहकार, शिक्षण आणि ग्रामीण राजकारणाच्या पायावर उभा असलेला हा प्रवास थेट राज्याच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचला. 1991 मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर सातत्याने विधानसभेतून जनतेचे प्रतिनिधित्व करत राहिले. बारामती मतदारसंघावर त्यांची पकड आणि संघटन कौशल्यामुळे ते राज्यातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
Ajit Pawar : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा!
अजित पवार हे अनेक वेळा मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. जलसंपदा, ऊर्जा, वित्त, नियोजन, ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, थेट भाषाशैली आणि प्रशासकीय पकड यामुळे ते वेगळ्या धाटणीचे नेते म्हणून ओळखले जातात. निर्णयक्षमता, कामाचा वेग आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची राजकीय ओळख राहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणूनही अजित पवारांकडे पाहिले गेले. पक्षातील अंतर्गत राजकारण, सत्तासंघर्ष आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेले धाडसी निर्णय यामुळे ते कायम चर्चेत राहिले. विरोधी पक्षनेते म्हणून तसेच महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला.
राजकारणाबरोबरच सहकार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही अजित पवार यांची सक्रिय भूमिका राहिली आहे. बारामती विद्या प्रतिष्ठान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था, तसेच विविध क्रीडा संघटनांमधील नेतृत्वामुळे ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी उभे केलेले नेटवर्क हे त्यांच्या ताकदीचे प्रमुख कारण मानले जाते.
Local body elections : मतदानाआधीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध !
आजच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर त्यांच्या राजकीय प्रवासाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. खासदार ते सातत्याने निवडून येणारे आमदार, अनेक वेळा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्वतंत्र अध्याय ठरलेला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची भूमिका, नेतृत्व आणि त्यांनी राज्याला दिलेले योगदान यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.








