Demand for Girish Mahajan’s resignation : गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचे नाव वगळले!

Ambedkarite organisations in Amravati turn aggressive : अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांचा आरोप, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Amravati नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंबेडकरवादी बहुजन महासंघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ पी. एस. खडसे, माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, अशांत रंगारी आणि सुनील रामटेके यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

नाशिक येथील घटनेनुसार, मंत्री महाजन यांच्या भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधुरी जाधव आणि दर्शनाताई यांनी सविनय निषेध नोंदवला होता. त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते.

Ajit Pawar Dies in Aircraft accident : अजितदादांची हिवरखेडमधील ‘ती’ भेट ठरली शेवटची

अमरावतीतील आंबेडकरवादी संघटनांनी या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच जाधव भगिनींना योग्य पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करताना या भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी संघटनांनी रेटली.

Ajit Pawar : खासदार ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा सिक्सर ठरलेला अजित पवारांचा राजकीय प्रवास

या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य गोपीचंद मेश्राम, दादासाहेब क्षीरसागर, रमेश रामटेके, हरिदास सिरसाठ, महादेवराव खंडारे, प्रभाकर घोडेस्वार, सचिन तेलमोरे, रामेश्वर रामटेके, संजय घरडे, नामदेवराव वासनिक, रविकांत गवई, प्रवीण वाघमारे, प्रभाकर शेंडे, सिद्धार्थ दामोधरे, अजय रामटेके, ओमप्रकाश बनसोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.