ZP Elections : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग

NCP (Sharad Pawar) holds organisational meeting in Khamgaon taluka : खामगाव तालुक्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक बैठक

Buldhana आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती देत तालुकास्तरीय बैठकींचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यात सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील प्रदेशस्तरीय पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच दोन्ही जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका, संघटन बळकटी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

Girish Mahajan : गिरीश महाजनांविरोधात शेगावात ‘वंचित’चे तीव्र आंदोलन

तालुक्यातील सर्व विधानसभा क्षेत्राध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा, तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी, विविध सेलचे तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक सोसायटीचे अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Amravati Municipal Corporation : अमरावती महापौर निवडणूक आठवडाभर लांबली; गट नोंदणीला दिलासा

डॉ. शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडत संघटन अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे हीच पक्षाची खरी ताकद आहे.” या बैठकीमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची निवडणूकपूर्व तयारी वेगाने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.