Ajit Pawar death news : राजकारणातला दिलदार विरोधक आणि शब्दाला पक्का सहकारी हरपला

Raj and Uddhav Thackeray said that politics has lost Ajit Pawar a large-hearted and magnanimous opponent : ठाकरे बंधूंकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली, राज व उद्धव यांच्याकडून आठवणीना उजाळा

Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर अत्यंत भावूक शब्दांत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. राजकारणातील मतभेद बाजूला सारून दोन्ही नेत्यांनी अजितदादांच्या प्रशासकीय कौशल्याचे, स्पष्टवक्तेपणाचे आणि दिलदार स्वभावाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

जातीपातीपलीकडचा एक उमदा नेता – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.

“दादा पवार साहेबांच्या मुशीत तयार झाले असले, तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीचा त्यांनी केलेला कायापालट विरोधकही मान्य करतील,” असे राज ठाकरे यांनी नमूद केले.

काम होणार नसेल तर तोंडावर सांगण्याचे धाडस दादांकडे होते. राजकारणात अशा स्पष्टवक्तेपणाची मोठी किंमत मोजावी लागते, असेही त्यांनी सांगितले.

“सध्याच्या काळात जातपात न मानता राजकारण करणारे नेते कमी उरले आहेत, त्यात अजित पवार अग्रणी होते,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी दादांच्या व्यापक दृष्टिकोनाचा गौरव केला.

Ajit Pawar : अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राने कुटुंबप्रमुख, आधारस्तंभ, लोकनेता गमावला

मंत्रिमंडळातील उत्तम सहकारी – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजितदादांसोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असतानाचा काळ त्यांनी यावेळी आठवला.

“मी मुख्यमंत्री असताना दादा माझे उपमुख्यमंत्री होते. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि अर्थ विभागाचा सखोल अभ्यास असणारे नेते होते. प्रशासनावर त्यांचा असलेला वचक वाखणण्याजोगा होता,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारणात वेगळा मार्ग स्वीकारला असला तरी दादांनी कधीही वैयक्तिक संबंध तुटू दिले नाहीत. ते दीर्घद्वेषी नव्हते, असेही त्यांनी नमूद केले.

Ajit Pawar death news : अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सर्वार्थाने ‘दादा’
“कार्यकर्त्यांना जपणारा आणि मनात येईल ते सडेतोड बोलणारा नेता राज्याने गमावला आहे. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते,” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली वाहिली.