The boyfriend threatened to make his girlfriend’s private videos viral : प्रियकराला नाशिकमधून अटक; तरुणीनेच केली होती तक्रार
Wardha सोशल मीडियावरून ओळख झाली. मग भेटीगाठी झाल्या. मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विषय लग्नापर्यंत येऊन पोहोचला. दोघांनीही आपापल्या घरी सांगायचं ठरवलं. कुटुंबियांच्या सहमतीनेच लग्न करण्याचा निर्णय झाला. दोन वर्षं दोघेही रिलेशीनशीपमध्ये राहिले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. अचानक त्याने काढलेले तिचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं. अखेर प्रेयसीनेच प्रियकराची तक्रार केली.
तब्बल दोन वर्षे तो युवतीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला. नंतर मात्र लग्नास टाळाटाळ करू लागला. एवढेच नव्हे तर तिचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. अखेर गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला नाशीक येथून जेरबंद केले. युवती वर्धा शहरातील रहिवासी आहे. तिची एका सोशल मीडिया प्लॅटफार्मवरून आरोपी सुशील मोकळ याच्याशी चार वर्षांपूर्वी ओळख झाली.
Guardian Minister of Maharashtra : पालकमंत्र्यांची बहुप्रतिक्षीत यादी अखेर जाहीर !
दोघांनी काही काळानंतर कुटुंबियांच्या सहमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते दोघे जवळपास सलग दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यावेळी आरोपी सुशीलने तिचे काही खासगी छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसांनी सुशील कुठल्या ना कुठल्या कारणांवरुन लग्नास टाळाटाळ करू लागला.
तो आपल्याशी लग्न करणार नाही, याची खात्री झाल्याने युवतीने संबंध तोडले. पण काही दिवसांनी आरोपी सुशील फोन करुन युवतीला त्रास देऊ लागला. तिला छायाचित्र, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीने तिला खासगी अश्लिल व्हिडीओ पाठविला. खासगी छायाचित्र व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी दिली.
PM Narendra Modi : मराठीतून संवाद, वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् विचारपूस!
तरुणीनेच दिली तक्रार
अखेर तरुणीनेच पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दिनेश कांबळे, अजय अनंतवार, गजानन मस्के, गणेश सातपुते याचे पथक सुशील मोकळचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे रवाना झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत विचारपूस केली.