Vidarbha State Protest Long March Nagpur : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निर्णायक एल्गार; २२ फेब्रुवारीला नागपुरात विराट ‘लॉन्गमार्च’

vidarbha-state-movement-long-march-planning-meeting-buldhana : ४ फेब्रुवारीला बुलढाण्यात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन; शेतकरी प्रश्नांसह रेल्वे मार्गासाठी आंदोलनाची धार वाढणार

Mehkar विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्या, ४ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे महत्त्वाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

२२ फेब्रुवारी रोजी नागपुरात निघणाऱ्या भव्य ‘लॉन्गमार्च’ची तयारी या बैठकीत पूर्ण केली जाणार आहे. केंद्र सरकारने विदर्भाच्या राज्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विदर्भप्रेमींनी आता ‘आरपार’च्या लढाईची तयारी सुरू केली आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीची ही जिल्हास्तरीय बैठक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बुलढाण्यातील पत्रकार भवन येथे संपन्न होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची अधिकृत रूपरेषा जाहीर केली जाणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथे लॉन्गमार्च काढला जाणार आहे.

Buldhana NCP Groups Reunion Updates : दुःखाच्या प्रसंगी राष्ट्रवादीचे ‘मनाचे विलीनीकरण’; बुलढाण्यात दोन्ही गट आले एकत्र

दुपारी २ वाजता चिटणीस पार्क येथील विदर्भ चंडिका मंदिर परिसरात विराट मेळाव्याने या आंदोलनाचा समारोप होईल. या आंदोलनातून विदर्भाच्या अस्मितेचा आणि विकासाचा आवाज थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा समितीचा मानस आहे.

या आंदोलनामध्ये प्रामुख्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करणे, आणि प्रलंबित खामगाव–जालना रेल्वेमार्गासाठी निधीची उपलब्धता या मागण्या मांडल्या जाणार आहेत. तसेच कापूस व सोयाबीन पिकांना भावांतर योजना लागू करावी आणि सर्पदंश मृत्यू प्रकरणी वन्यजीव नुकसान भरपाई द्यावी, यांसारख्या स्थानिक व शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर समितीने जोर दिला आहे. समितीचे मुख्य निमंत्रक आमदार वामनराव चटप यांच्यासह रंजनाताई मामर्डे आणि डॉ. पी. आर. राजपूत या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

Nashik Municipal Corporation Mayor Election Twist : नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप! भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेचे महापौरपदासाठी अर्ज

विदर्भाच्या हक्कासाठी होणाऱ्या या बैठकीस आणि नागपूरच्या लॉन्गमार्चला विदर्भप्रेमी नागरिक, महिला, युवक आणि विशेषतः शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक तेजराव मुंडे आणि जिल्हाध्यक्ष राम बारोटे यांनी केले आहे.