व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीची हालचाल

NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीची हालचाल

ncp-president-sunetra-pawar-unopposed-election-budget-session : अर्थसंकल्प अधिवेशनातच निर्णयाची शक्यता

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्या दृष्टीने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. पक्षाची अध्यक्ष निवड पुढील एक महिन्याच्या आत, विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीतच पूर्ण करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी त्यांनी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना याबाबत कल्पना दिली होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले होते.

Raj Thackeray : ‘प्रशासनाचा कोडगेपणा अनाकलनीय!’; ३२ तासांच्या कोंडीवरून राज ठाकरेंची टीका

अजित पवार हयात असताना शरद पवार यांच्या गटाकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाबाबत प्रस्ताव येत होते. हे प्रस्ताव अजित पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले होते. एकत्रीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात मानले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले की, या विषयावर नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याशी कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नव्हती. भविष्यातील सर्व राजकीय निर्णय सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे घेतील, असेही म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Nana Patole Vs Parinay Fuke : भंडाऱ्यात पटोले-फुके संघर्षात शंकर राऊतांचा ‘गेम’; काँग्रेस सोडली पण भाजपची दारेही बंद!

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्यात यावे, अशी मागणी पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे. आमदारांकडून सुरू झालेली ही मागणी आता पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 हून अधिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी मागणी करणारे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे पक्षावर मोठा आघात झाला. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना खाजगी विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी बारामती येथे लाखो समर्थक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sunetra Pawar oath : तातडीचा निर्णय नव्हता; सर्व प्रक्रिया नियमानुसारच

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या नेतृत्वाची दिशा देण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता अधिक बळावत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच याबाबत औपचारिक निर्णय होण्याची दाट शक्यता असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महत्त्वाच्या घडामोडीकडे लागले आहे.

___

error: Content is protected !!