
amravati-mla-j-m-abhyankar-exposes-poor-education-quality-in-anjangaon-surji-school : माजी शिक्षण सचिव ज. मो. अभ्यंकर यांच्या भेटीत उघड झाले धक्कादायक वास्तव
Amravati राज्याचे माजी शिक्षण सचिव आणि विद्यमान आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाला दिलेल्या भेटीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला “Where do you live?” (तुम्ही कुठे राहता?) हा अत्यंत प्राथमिक प्रश्नही इंग्रजीत उत्तरता आला नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदारांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अंजनगाव नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष अविनाश गायगोले आणि मुख्याधिकारी लोहकरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी नगरपरिषद माध्यमिक विद्यालयातील वर्गांची पाहणी केली. नवव्या वर्गातील एका विद्यार्थिनीची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी आमदारांनी तिला इंग्रजीत नाव आणि पत्ता विचारला. मात्र, ‘Where do you live?’ या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थिनी पूर्णतः गोंधळून गेली. नववीच्या विद्यार्थ्याला किमान इंग्रजी संभाषण जमणे अपेक्षित असताना, विद्यार्थिनी निरुत्तर राहिल्याने आमदारांनी तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची कानउघाडणी केली.
https://sattavedh.com/ncp-president-ncp-president-sunetra-pawar-unopposed-election-budget-sessio
नगरपरिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या पगारावर शासन दरमहा लाखो रुपये खर्च करते. मात्र, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये त्या दर्जाचे ज्ञान झिरपताना दिसत नाही. शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांचे या शाळांमधील गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला.ग्रामीण भागातील शाळांमध्ये केवळ उपस्थितीवर भर दिला जातो की खरोखर अध्यापन होते, याबाबत आता पालकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.








