Eknath shinde : सलमान खान भारतीय नागरिक; आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात गैर काय?

salman-khan-rss-program-eknath-shinde-reaction-mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट मत

Mumbai : सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत या चर्चांना उत्तर दिले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशासाठी कार्य करत आहे. देशावर कोणतेही संकट आले की स्वयंसेवक मदतीसाठी सर्वप्रथम पुढे येतात. संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Nitin Gadkari Devendra Fadnavis : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला कॅबिनेटचा ‘बूस्टर डोस’; कळमेश्वरमध्ये ‘कोल टू केमिकल’ प्रकल्प

सलमान खान यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक आहे आणि तो भारतातील परंपरा, संस्कृती आणि मूल्यांना मानणारा कलाकार आहे. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने त्याला उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Buldhana ZP election : बुलढाण्यात काँग्रेसची ‘आरपार’ची लढाई; पराभवाच्या धसक्याने प्रदेशाध्यक्ष रणनीती बदलणार?

एखादा कलाकार किंवा नागरिक कोणत्या सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतो, यावरून अनावश्यक वाद निर्माण करणे योग्य नाही, असे सूचक मतही शिंदे यांनी व्यक्त केले. सलमान खान यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चांवर अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

__