Pune MIT vandalism : पुण्यात एमआयटीच्या सांस्कृतिक महोत्सवात राडा; बांगलादेशी स्टॉलची तोडफोड!

mit-wpu-world-cultural-festival-bangladeshi-stall-vandalism-bjym-allegations : कोथरूडमध्ये ‘भाजयुमो’ कार्यकर्त्यांचा धुमाकूळ; भारतविरोधी घोषणाबाजीचा आरोप करत महोत्सवात घातला गोंधळ

Pune विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) परिसरात आयोजित ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल’ला गालबोट लागले आहे. विविध देशांतील संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात काही युवकांनी घुसून बांगलादेशच्या स्टॉलवर हल्ला केला आणि साहित्याची तोडफोड केली. या घटनेमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यामागे भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये दरवर्षीप्रमाणे परदेशी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा मूळ उद्देश विविध देशांमधील संवाद आणि ऐक्य वाढवणे हा असतो. कार्यक्रम शांततेत सुरू असताना काही बाहेरील युवक घोषणाबाजी करत कॅम्पसमध्ये शिरले. त्यांनी थेट बांगलादेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टॉलला लक्ष्य केले.

Nashik Mahavitaran : नाशिकमध्ये सरकारी जमिनीवर ‘भू-माफियांचा’ डोळा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

हल्लेखोरांनी बांगलादेशच्या कथित “भारतविरोधी” भूमिकेचा निषेध करत स्टॉलवरील साहित्याची नासधूस केली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे महोत्सवात सहभागी झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या तोडफोडीत भाजपच्या युवा आघाडीचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतल्याने आयोजकांना काही काळ कार्यक्रम थांबवावा लागला. मात्र, या आरोपांबाबत भाजयुमोच्या अधिकृत प्रवक्त्यांकडून अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Raut Vs Shinde : ‘गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला’ म्हणत राऊतांचा शिंदेंवर घणाघात

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी विद्यापीठ गाठले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवले जात आहेत. “कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक कार्यक्रमात अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप आणि तोडफोड झाल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.