Nagpur Crime : बापाचा जीव जाईपर्यंत गळा आवळला!

 

A minor killed his father, arrested : अल्पवयीन मुलाचे कृत्य; आईसह अटकेत

Nagpur बापाच्या रोजच्या दारु पिण्याला, आईला मारहाण करण्याला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. बापाने आईला पोटात लाथ मारल्यावर त्याला राग अनावर झाला. आणि त्याने बापाचा जीव जाईपर्यंत टॉवेलने गळा आवळला. या घटनेने नागपूर शहर पुरते हलून गेले आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दहावीत शिकणाऱ्या मुलाने वडिलाचा गळा आवळून खून केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलगा व त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे. मुकेश (५७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

BJP-NCP wins Panchayat Samiti Chairman election : भाजपचाच डंका; राष्ट्रवादीसोबत समीकरण कायम

मुलाने वडिलाचा खून केल्याचे आईच्या लक्षात येताच तिने डोक्यावर हात मारला. परंतु, रागाच्या भरात कृत्य केल्यानंतर आईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मृतदेह नदीत फेकण्याचे नियोजन केले. त्यासाठी त्याने आपल्या एका मित्राला फोन केला. घडलेली घटना सांगितली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली. मात्र, मित्राने त्याची भेट घेतली आणि समजूत घातली.

पोलिसांत जाऊन सर्व घटना सांगण्यास सांगितले. दोघेही हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांची भेट घेऊन घटना सांगितली. त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा नोंदविला आणि मायलेकांना ताब्यात घेतले.

 

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

मुकेश हा एका दुकानात काम करायचा. पत्नी निर्मला व दोन मुले असा त्याचा परिवार आहे. मोठा मुलगा पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो. तर लहान दहावीत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मोठा पुण्यात नोकरी करतो. तर लहान अभ्यासात हुशार आहे. पण सुटीच्या दिवशी कामाला जातो. मुकेशला दारुचे व्यसन होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे दारुचे व्यसन खूप वाढले.

दारुच्या नशेत दोघेही मायलेकाला शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे पत्नी व मुलगा मुकेशच्या त्रासाला कंटाळले होते. दारु पिऊन आल्यानंतर घरात वाद करणे आणि मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते. रविवारी रात्री ११ वाजता मुकेश दारु पिऊन घरी आला. त्याने पत्नी निर्मलाला शिवीगाळ आणि मारहाण केली. मुलगा वाद सोडविण्यासाठी गेला. त्यालाही वडिलांनी मारहाण केली. मुकेशने पोटात लाथ मारल्यामुळे आई तरफडत होती. त्यामुळे बंटीचा राग अनावर झाला. त्याने घरातील टॉवेलने त्याच्या वडिलांचा गळा आवळला. काही मिनिटातच मुकेशचा जीव गेला.