Ayush meeting : शेगावात आयुष विभागाच्या बैठकीत महायुतीची ‘एकजूट’

political-unity-at-ayush-department-meeting : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर

Shegao राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे आयुष विभागाची नियोजन बैठक पार पडली. वरकरणी ही बैठक प्रशासकीय स्वरूपाची असली, तरी तिचा राजकीय अर्थ लावला जात असल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले महायुतीतील घटकपक्ष या बैठकीत मात्र एकत्रितपणे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते एकाच सभागृहात, एकाच व्यासपीठावर दिसल्याने “राजकारणात काहीही शक्य असते” या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची चर्चा रंगली.

Wamanrao Chatap : २०२७ च्या पूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती होणार! विदर्भातील खासदारांनो राजीनामे द्या

विशेष म्हणजे, अलीकडच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर कट्टर विरोधक असलेले नेते या बैठकीत सौहार्दपूर्ण वातावरणात एकत्र बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय बैठक होती की महायुतीची शक्तिप्रदर्शनाची रंगीत तालीम, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Harshwardhan Sapkal : ‘फडणवीस औरंगजेबाप्रमाणे क्रूर, नथूराम गोडसेप्रमाणे थंड रक्ताचे’

या घडामोडींच्या केंद्रस्थानी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक आगामी स्थानिक राजकारणासाठी नवी दिशा देणारी ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत, राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने पार पडलेली ही नियोजन बैठक प्रशासनापुरती मर्यादित न राहता, महायुतीतील एकजूट आणि संभाव्य राजकीय समीकरणांचा स्पष्ट संदेश देणारी ठरल्याची चर्चा सध्या शेगावात रंगत आहे.