Nagpur municipal corporation : ‘एक अनार सौ बिमार’…स्वीकृतसाठी तब्बल ७०० इच्छुकांच्या शिफारसी

700 recommendations for co-opt member : भाजपनेही केले ‘स्वीकृत’ नगरसेवकासाठी पराभूत उमेदवारांचे दार बंद

Nagpur नागपूर महापालिकेत भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. त्यानुसार सत्ताही स्थापन केली आहे. उमेदवारी वाटप करताना हजारो कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. मात्र दीडशे जागेची मर्यादा असल्याने अनेकांना नाराज करावे लागले. काहींना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते.

सध्या स्वीकृतसाठी तब्बल ७०० इच्छुकांच्या शिफारसी आल्या असल्याचे समोर आले आहे. त्यातून भाजपला फक्त सात इच्छुकांची निवड करायची आहे. सध्या ‘एक अनार सौ बिमार’ अशी परिस्थिती असल्याने काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही पराभूत उमेदवारांसाठी महापालिकेचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुढे आले आहे.

Nagpur municipal corporation : स्वप्नपूर्ती घरकूल योजनेचा ‘कचरा’, प्रशासनाचा गलथान कारभार

भाजपचे एकूण १०२ नगरसेवक निवडून आले आहेत. नीता ठाकरे महापौर तर लीला हातीबेड यांना महापौर करण्यात आले आहे.

स्थायी समितीच्या सभापती म्हणून शिवानी दाणी यांचे नाव निश्चित आहे. उद्या मंगळवारी स्थायी समिती आणि विशेष समित्यांचे सदस्य निवडून घोषित केले जाणार आहेत. सर्व विशेष समित्यांचे सभापती आणि झोन समित्यांवर सभापती म्हणून महिला नगरसेविकांची नियुक्ती करण्याचे भाजपने ठरवले आहे.

१५१ नगरसेवक असलेल्या नागपूर महापालिकेत एकूण १० जणांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करायची आहे. यानुसार १५ नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत सदस्य असा कोटा निश्चित झाला आहे. कोट्यानुसार भाजपचे सात आणि एमआयएमचा एक कार्यकर्त्याची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त होणार आहे.

Nagpur municipal corporation : भाजपचा पुरुष नगरसेवकांना मोठा धक्का, सर्व समित्यांवर महिला नगरसेविकाच नियुक्त करणार

शिंदे सेनेला एक स्वीकृत सदस्य देण्याचे आश्वासन युती करताना देण्यात आले होते. हे बघता भाजपला फक्त सहा सदस्यच नियुक्त करायचे आहे. काँग्रेस आघाडीचे दोन नगरसेवक स्वीकृत होणार हे निश्चित आहे. एमआयएम आणि मुस्लिम लीग आघाडीकडे १० नगरसेवक आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गट म्हणून त्यांच्या कोट्यात एक सदस्य जाणार आहे. सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी भाजपच्या काही दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.

Ayush meeting : शेगावात आयुष विभागाच्या बैठकीत महायुतीची ‘एकजूट’

यात अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, माजी उपमहापौर संदीप जाधव, भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष प्रगती पाटील यांचा यात समावेश आहे. सध्या निवडून आलेल्यांपैकी पाच सात जणांचा अपवाद वगळता सर्वच नवीन आहेत. हे बघता काही अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवकांना स्वीकृत म्हणून महापालिकेत पाठवण्यात येणार असल्याची चर्चा होती.