Mayor-Vijay-Agrawal-directed-to-remove-encroachments : पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडवर; झोननिहाय कारवाईचा आढावा
Akola शहर ‘अतिक्रमणमुक्त’ करण्याच्या संकल्पनेअंतर्गत सोमवारी महापौर शारदा रणजित खेडकर यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृहनेते पवन महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत महापौर खेडकर यांनी शहरातील प्रमुख चौक व मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या झोननिहाय कारवाईचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. झोननिहाय अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, वळण रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे, तसेच रस्त्यावर बांधकाम साहित्य आढळल्यास तत्काळ कारवाई करून रस्ते मोकळे ठेवावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
DPC Amravati : ना निवडणूक झाली, ना निवड; डीपीसीचे भिजत घोंगडे
महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमणे प्रभावीपणे हटविण्यासाठी ओपन थिएटरच्या मागील बाजूस विकसित करण्यात आलेल्या हॉकर्स झोनमध्ये, तसेच लहान उमरी परिसरातील जुनी मनपा शाळा क्रमांक ५ येथे उभारण्यात आलेल्या दोन स्वतंत्र हॉकर्स झोनमध्ये संबंधित सर्व फेरीवाले व व्यावसायिक हॉकर्सनी तात्काळ स्थलांतर करावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Nagpur municipal corporation : स्वप्नपूर्ती घरकूल योजनेचा ‘कचरा’, प्रशासनाचा गलथान कारभार
शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. प्रत्येक कनिष्ठ अभियंत्याने आपल्या कार्यक्षेत्रात दररोज स्थळ निरीक्षण करून अनधिकृत बांधकाम आढळल्यास तत्काळ नियमानुसार कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी झोननिहाय पथकांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासह आवश्यक साहित्य व साधनसामग्रीची तातडीने खरेदी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.








