Khamgao Municipal council : पाणीपुरवठा विस्कळीत, वसुली ठप्प! खामगाव पालिकेसमोर ६० टक्के पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट

60%-water-tax-recovery-target-set-for-Khamgaon-Municipal-Council : तांत्रिक अडचणी, जलवाहिन्यांच्या गळती आणि कमी दाबाने होणारा पुरवठ्याचे आव्हान

Khamgao आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले असताना खामगाव नगरपालिकेसमोर पाणीपट्टी वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शहरात वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांनी थेट करभरणीकडे पाठ फिरवली असून तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

तांत्रिक अडचणी, जलवाहिन्यांच्या गळती आणि कमी दाबाने होणारा पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. “पाणीच मिळत नसेल तर कर कशाचा?” असा संतप्त सवाल करदात्यांकडून उपस्थित होत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad : होमग्राऊंडवरच काँग्रेस शून्यावर, तर महाविकास आघाडीला पुढे कसे नेणार?

करवसुलीचा ताळेबंद (खामगाव)

मालमत्ताकर उद्दिष्ट: ₹11,11,26,606
पाणीकर उद्दिष्ट: ₹2,74,10,347
एकूण उद्दिष्ट: ₹13,85,36,953
मालमत्ता कर वसुली: ₹11,73,80,229
पाणीकर वसुली: सुमारे ₹1.13 कोटी
एकूण वसुली: ₹12,87,24,029

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास उर्वरित थकबाकी वसूल करणे कठीण असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, प्रशासन ३१ मार्चपूर्वी विशेष मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, नांदुरा नगरपरिषदेसमोरही ५ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे आव्हान आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी ६.४० कोटी रुपये असून आतापर्यंत १.४५ कोटींची वसुली झाली आहे. पाणीपट्टीपैकी १.४४ कोटींच्या मागणीतून २३.८५ लाख रुपये वसूल झाले आहेत.

President Draupadi Murmu Visit : बुलडाण्यातील ७९ रुग्णालये व्हेंटिलेटरवर, काँग्रेसचा दावा

थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देत प्रशासनाने विशेष पथके नियुक्त करण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे नागरिक सेवा-सुविधांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे पालिका महसूल वाढविण्याच्या दबावाखाली आहे. पाणीपुरवठा सुधारणा आणि कडक वसुली—या दोन टोकांमध्ये सध्या स्थानिक प्रशासन सापडल्याचे चित्र आहे.