₹29-crore-public-contribution-for-29-roads-stir-over-proposal-to-increase-taxes : ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान’ निधी मिळवण्यासाठी १० टक्के हिस्सा; मालमत्तांवर भरमसाठ करवाढीचा आरोप
Khamgao शहरातील २९ सिमेंट रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना, त्यातील १० टक्के लोकवर्गणी म्हणून सुमारे २९ कोटी रुपये नगरपालिकेला उभारावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर मालमत्तांवर भरमसाठ करवाढ प्रस्तावित केल्याचा आरोप होत असून शहरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खामगाव नगर परिषद ला सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे. मात्र, पूर्ण निधी मिळवण्यासाठी १० टक्के लोकहिस्सा भरणे बंधनकारक आहे.
नगरपरिषदेकडून लोकवर्गणीचा पहिला टप्पा म्हणून ४ कोटी १६ लाख ३० हजार ६७ रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील २१ किलोमीटर लांबीच्या २९ रस्त्यांपैकी २२ रस्त्यांसाठी २० कोटी ३७ लाख, तर उर्वरित ७ रस्त्यांसाठी ८ कोटी ६३ लाख रुपये लोकवर्गणी म्हणून भरावे लागणार आहेत.
Vidarbha Farmers : अकोला जिल्ह्यात ३६ ठिकाणी शिवसेनेचा रास्ता रोको
उर्वरित हिस्सा उभारण्यासाठी नगरपरिषदेकडून शासनाकडे कर्ज प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. लोकवर्गणीची अट पूर्ण झाल्यानंतरच पुढील निधी वितरित होणार असल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या रस्ते प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे येथील कंत्राटदार कंपनीकडून काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. उर्वरित बिले देण्यासाठीही लोकवर्गणीचा हिस्सा भरणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
लोकवर्गणी उभारण्यासाठी नगरपरिषदेकडून मालमत्ता करात मोठी वाढ प्रस्तावित केल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रस्तावित करवाढ लागू होण्यापूर्वीच तब्बल ९ हजार ७७ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या होत्या; मात्र त्यांनाही कर भरणा करावा लागल्याने मोठ्या प्रमाणावर थकीत वसुली होत असल्याची चर्चा आहे.
Sunetra pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
रस्ते विकासाच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला जात असल्याची भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, नगरपरिषदेकडून अधिकृत भूमिका काय घेतली जाते आणि करवाढीबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे खामगावकरांचे लक्ष लागले आहे.








