Amendments to bye-laws rejected by Divisional Joint Registrars : विभागीय सहनिबंधकांनी फेटाळल्या उपविधीतील दुरुस्त्या
Amravati दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या उपविधीतील दुरुस्त्या विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्हा बँकेतील राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हरीभाऊ मोहोड व इतर १२ संचालकांनी घेतली आक्षेपांची भूमिका
उपविधीतील दुरुस्तीविरोधात हरीभाऊ मोहोड व इतर १२ संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. बँकेच्या उपविधीप्रकरणी गेल्या वर्षभरात सहकार मंत्री, उच्च न्यायालय आणि विभागीय सहनिबंधक स्तरावर सुनावण्या सुरू होत्या. संचालकांच्या आक्षेपांमुळे उपविधी दुरुस्तीसंदर्भातील मान्यतेचा निर्णय लांबला होता. उच्च न्यायालयाने सहकार मंत्री व विभागीय सहनिबंधकांना प्रकरण पुनर्विचारासाठी परत पाठवले होते.
MVA to attack government: महविकास आघाडी सरकारविरोधात करणार हल्लाबोल!
१७ जानेवारी रोजी विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थाअधिनियम, १९६० च्या कलम १३ (२) (३) अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार, कायद्याला विसंगत उपविधी दुरुस्त्या फेटाळून लावल्या.
सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेला उपविधी दुरुस्तीचा ठराव बेकायदेशीर असल्याचे हरिभाऊ मोहोड यांनी नमूद केले. विभागीय सहनिबंधकांनी १९ वेळा सुनावण्या घेतल्यानंतर हा निर्णय दिला. विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करताना सत्ताधाऱ्यांवर नियमभंगाचे आरोप केले आहेत.
बँकेच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षणाची मागणी
संचालक बबलू देशमुख यांनी बँकेतील अनियमितता व बेकायदेशीर ठरावांवर टीका करत शासनाने लेखापरीक्षण करण्याची मागणी केली.
कायदेशीर लढ्याचा इशारा
उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.
Government niglecting Vidarbha Farmers : शेतकऱ्यांचे चुकारे दोन महिन्यांपासून थकलेलेच!
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
संचालक रविंद्र गायगोले यांनी बँकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अवमाननाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला. विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयामुळे बँकेतील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणाचा शेवट कायदेशीर लढाईत होण्याची शक्यता आहे.