67 projects in Washim district : वाशिम जिल्ह्यात 67 प्रकल्पांच्या उभारणीला वेग
ग्रामीण भागात भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यातही वीज पुरवठा वारंवार खंडीत हाेत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आता नविन वर्षात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 67 ठिकाणी सौरप्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. यातून 175 मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. नविन वर्षात 20 पेक्षा अधिक प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.
कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही योजना राबविण्यात येत अहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा, अखंडित व शाश्वत वीजपुरवठा शक्य होणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत. या सौर प्रकल्पांच्या कामांना गती आली असून, येत्या वर्षभरात यातील 20 पेक्षा अधिक प्रकल्पांचे लोकार्पण होण्याचा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
1 हजार 254 एकर जमीनींचे हाेणार अधिग्रहन
वाशिम जिल्ह्यात विविध साैर प्रकल्पांसाठी महावितरणकऊन 1 हजार 254 एकर जमीनींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणशी करार करण्यात आला आणि आता प्रत्यक्ष या सौर प्रकल्पांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाही सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
दाेन प्रकल्पामधून हाेतोय वीज पुरवठा
जिल्ह्यात दाेन साैर प्रकल्पांमधून वीज पुरवठाही सुरू झाला आहे़ मंगरूळपीर तालुक्यातील हिसई येथील प्रकल्पामुळे 1053 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे, तर दुसरा प्रकल्प कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे सुरू झाला आहे़ या प्रकल्पातून 1711 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती साैर प्रकल्प?
वाशिम – 10
रिसोड – 8
मंगरूळपीर – 16
मालेगाव – 7
मानोरा – 14
कारंजा – 6