Shivsena UBT : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा कट?, परिसरात संशयास्पद हालचाली

murder-attempted-of-shivsena-city-chief-rahul-karale : राहुल कराळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत मांडली कैफियत

Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करत कराळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

राहुल कराळे हे एमएच-३० बीबी २७०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने लोखंडे ले-आऊट, मोठी उमरी येथील त्यांच्या घरी आले असता मोटारसायकलवरून आलेल्या काही युवकांनी हातात लाठ्या, लोखंडी अवजारे व तलवारी घेऊन प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र कराळे यांनी प्रसंगावधान राखल्याने हल्ला अयशस्वी ठरला. या घटनेत चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), ३२४(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Ajit Pawar death : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात, सत्य लवकरच बाहेर येईल

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या कामगिरीमुळे स्थानिक भाजप नेतृत्व नाराज झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कराळे यांनी आपल्या बयानात असा दावा केला आहे की, एका नेत्याने फोनवरून ‘तू जास्त वळवळ करत असशील तर तुझा गेम करावा लागेल’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी दोघांनी दोन मोटारसायकलींवर इतर काही जणांसह वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आ

Sudhir mungantiwar : धारदार आयुधांचा ‘अनुभवी’ वापर आणि आ.सुधीर मुनगंटीवार यांची धडाकेबाज मांडणी

या घटनेनंतर परिसरात काही असामाजिक घटक व गुन्हेगारांकडून संशयास्पद हालचाली वाढल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कराळे यांनी नमूद केले आहे. कोणत्याही प्रसंगी प्राणघातक हल्ला किंवा मृत्यू झाल्यास त्याला पोलिस प्रशासनासह मुख्य सूत्रधार जबाबदार राहतील, असेही त्यांनी बयानात नमूद केले आहे.

Farmers Loan waiver : बँक कुठलीही असो, कर्जमाफी शेतकऱ्यांनाच मिळणार; मुख्यमंत्र्यांनी फेटाळले सर्व दावे

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हल्लेखोरांचा राहुल कराळे यांच्याशी यापूर्वी कोणताही वैयक्तिक संबंध नसल्याचे समोर आले आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वी कोणतेही वाद किंवा भांडण झालेले नसल्याने हल्लेखोरांना कोणी प्रवृत्त केले, या घटनेमागचा खरा सूत्रधार कोण, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या हल्ल्यामागील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्यालाही तत्काळ अटक करावी, अशी मागणी कराळे यांनी केली आहे.