Breaking

Animea prevention : बाय बाय अॅनिमिया! आजार रोखण्यासाठी देशभर फिरणार बस

A bus will travel across the country to prevent anemia said Dr. Avinash Gawande : ॲनिमिया टाळण्यासाठी बस देशभर फिरणार असल्याचे डॉ.अविनाश गावंडे यांनी सांगितले

Nagpur लोह आणि व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थॅलेसेमिया, सिकलसेल अॅनिमिया यासारख्या आजार ग्रासतात. लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रेसिडेन्शियल अॅक्शन प्लान २०२५ अंतर्गत ‘बाय बाय अॅनिमिया’ आणि ‘ब्रेथ अझी प्रोग्राम’ सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी बस तयार करण्यात आली आहे. ती देशभर तपासण्या करत जनजागृतीचे काम करणार आहे, असे इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खडतकर यांनी सांगितले.

प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ. विंकी रुघवानी, अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा हजारे, एओपीचे अध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सचिव डॉ. कैलाश वैद्य, संयोजक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. गिरीश चरडे, ज्ञानेश विजय आदी उपस्थित होते. संघटनेच्यावतीने २५ प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात हा आजार बघायला मिळतो. हा आजार रोखण्यासाठी औषधांपैक्षा सकस आहार देण्यावर भर दिला जात आहे, असे डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.

MLA NITIN DESHMUKH ON DHANANJAY MUNDE : गोपीनाथ मुंडे असते तर हाकलून लावले असते

१५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील शाळा, वृद्धाश्रमात ही बस फिरून जनजागृती करणार आहे, असे डॉ. खडतकर यांनी सांगितले. शहरी मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण वाढत आहे. औषधांबाबत असणारे गैरसमज दूर होण्याची गरज आहे, असे डॉ. हजारे म्हणाल्या. उपचारासाठी आता अत्याधुनित तपासण्या उपलब्ध असल्याचे डॉ. रुघवानी यांनी सांगितले. या तपासण्यांमधून आलेला अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे डॉ. खडतकर म्हणाले.