Breaking

Arvind Sawant: खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन

An effigy of MP Arvind Sawant was burnt : बडनेऱ्यात शिवसैनिक आक्रमक; संघटनेतील फेरबदल अमान्य

अमरावती: शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आल्याचे बडनेऱ्यात दिसून आले. दोन दिवसांपूर्वी जिल्हा संघटनेत फेरबदल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत बडनेरा शहरात संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन केले.

अरविंद सावंत अमरावती जिल्ह्यात संपर्कप्रमुख झाल्यापासून जिल्ह्यात पक्षाची स्थिती खालावल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. त्यांच्या मते, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आणि निष्क्रिय कार्यकर्त्यांना पदे दिली जात आहेत. त्यामुळे कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

BJP CONGRESS : भाजप जोमात; काँग्रेस सुस्त !

मंगळवारी रात्री आठ वाजता बडनेरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आठवडी बाजार, नवी वस्ती येथे या असंतोषाचा जाहीर निषेध करण्यात आला. बडनेरा शहर शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या आंदोलनात कुचीन कैथवास, उमेश वाठ, प्रकाश बांते, रवी अंबाडकर, राजू अक्कलवार, शेखर घिमे, संदीप इंगोले, निलेश सावळे, संजय खांडेकर, स्वप्नील दारोकार, सागर पंदे, सुरेश देव्हारे, आनंद जोशी, सनी कैथवास, आकाश कैथवास, रवी कैथवास, कैलाश कैथवास, सतीश कुरवाळे, शैलेश देशमुख, रवी तरारे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Fire in Malkapur : मलकापूरात भीषण आग; ५० लाखांचे नुकसान

या घटनेनंतर पक्षातील असंतोषावर मात करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जाण्याची मागणी केली जात आहे.