Big blow to UBT : अकोल्यात शिवसेनेत मोठी फूट; उद्धव गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटात

Five-corporators-from-ubt-shivsena-join-shinde-factor-akola : आणखी काही पदाधिकारी रामराम ठोकण्याच्या तयारीत

Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अवघ्या महिन्याभरातच शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पाच नगरसेवक थेट शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील झाले आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह नगरसेवक मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पांडे गुरुजी उपस्थित होते.

Narendra modi : मोठं वक्तव्य ; “राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो”

महापालिका निवडणुकीनंतर इतक्या लवकर झालेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः मंगेश काळे यांच्यासारख्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने गटांतर केल्याने उद्धव गटाची अकोल्यातील ताकद कमी झाल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींमुळे आगामी महापालिका कारभारात शिंदे गटाचे बळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच इतर काही पदाधिकारीही गटांतराच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे अकोल्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.