Don’t fall for the bait: Cybercriminals are becoming active : आमिषाला बळी पडू नका : सायबर गुन्हेगार होत आहेत सक्रिय
Wardha News : सणांच्या पार्श्वभूमीवर सायबर लुटारूंकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह, पेटीएम, फोन पे, गुगल पे यांसारख्या बनावट ॲपद्वारेही फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. काही ठिकाणी असे प्रकार होत असल्याने बनावट ॲप व सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सायबर पोलिसांकडे ऑनलाइन फसवणुकीच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असतात. यात आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलिस ठाण्यांपर्यंत येणारे अनेक जण असतात. त्यात सण – उत्सव काळात सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय होत असतात. सोशल मीडियावर विविध ऑफरसह फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सजग राहणे गरजेचे आहे.
The birth rate of girls increased : जिल्ह्याला लक्ष्मी पावली, मुलींचा जन्मदर वाढला !
लिंक डाऊनलोड करू नका
प्रत्यक्षात सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवितात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे.
वाचू शकतात पैसे
फसवणुकीमध्ये तीन टप्प्यांत काम चालते. फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच त्याच वेळेस दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते, तर काही प्रकरणांत विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे दिसते. अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली मर्यादा, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यास तत्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.
Backpacks on students’ backs : विद्यार्थ्यांच्या पाठीवर दहा किलोचे दप्तर !
तपशील बदलता येतो
१. गुगलवरील तपशील अचूक असण्यासाठी गुगलने सजेस्ट ॲन एडिट हा पर्याय दिला व त्याद्वारे तपशील बदलता येतो.
२. ऑनलाइन ठगांनी सजेस्ट ॲन एडिटचा हा पर्याय वापरून संकेतस्थळावरील अधिकृत संपर्क बदलून स्वतःचा मोबाइल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे.
३ समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी आहे, असे भासवून नागरिकांकडे बँकेने कार्ड ब्लॉक केल्याची भीती घालून डेबिट-क्रेडिट कार्डाची माहिती घेतात. त्याआधारे ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढतात.