व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gopikishan bajoria : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही

Gopikishan bajoria : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही

Will not tolerate insult to Chhatrapati Shivaji Maharaj. : शिवसेना उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा इशारा*

Akola तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविताना गावात तणाव. अधिकार नसताना पोलिस प्रशासनाकडून पुतळा हटविण्याची प्रक्रिया होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सध्या तेल्हारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार मोठ्या बंदोबस्तासह गावात दाखल झाले आहेत.

गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशनची बाजोरिया यांनी तत्काळ अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासोबत फोनवर चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्याचा पोलिसांना अधिकार नाही.

Amol Mitkari : अकोल्यातील अघोरी पुजेचा अजित पवारांच्या अपघाताशी संबंध?

त्यामुळे तत्काळ कारवाई थांबविण्याची सूचना केली. या संदर्भात अकोला जिल्हाधिकारी व तेल्हारा तहसीलदारांनाही आमदार बाजोरिया यांनी छत्रपतींचा पुतळा हटवू नका, अशी सूचना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नसून ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुतळा त्याच जागेवर ठेवावा, अशी सूचना माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

error: Content is protected !!