Protest by MLA Amol Mitkari on the steps of the legislature : अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य उघड करण्यासाठी विधानमंडळात तातडीच्या चर्चेची मागणी
Akola महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत राज्यभरात तीव्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेमागे घातपाताची शक्यता असल्याबाबत जनतेच्या मनात गंभीर शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर, सदर प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात, या गंभीर विषयावर विधान परिषद व विधानसभेत तातडीने चर्चा घडवून आणावी, अशी ठाम मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात त्यांनी विधानभवनात अजित पवार यांचा फोटो हातात घेऊन प्रवेश केला व विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले व शासनाचे लक्ष वेधले.
Harshwardhan Sapkal : मोदी आता तुमचे ऐकत नाही का?, सपकाळ यांचा सरसंघचालकांना सवाल
या आंदोलनाच्या माध्यमातून “अजितदादांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे आणि निर्माण झालेला संभ्रम दूर झाला पाहिजे,” असा ठाम संदेश देण्यात आला. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर व तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
Eknath Shinde Shivsena : शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी याचिका
सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून विधानमंडळात सविस्तर चर्चा घडवून आणावी व सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त केली आहे.








