Sulabha Khodke seeks the post of Chairperson of the Women’s Commission : अजित पवार गटाचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Amravati राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके उत्सुक आहेत. त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने करण्यात आली आहे. महापालिकेतील स्थायी समिती सभापती तथा पक्षाचे नेते अविनाश मार्डीकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडे असून काही अपरिहार्य कारणांमुळे माजी अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. परिणामी, महिलांच्या न्यायासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने आमदार सुलभा खोडके या योग्य उमेदवार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
Vidarbha Farmers : कलम ५१ तात्काळ रद्द करा, शेतकरी संघटनेचा एल्गार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’ची स्थापना २५ जानेवारी १९९३ रोजी करण्यात आली असून, महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, तक्रारींचे निवारण करणे आणि संविधानिक हक्कांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही आयोगाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
Iran War update : युद्धाच्या सावटाखाली नागपूरकर; गॅसनंतर आता पेट्रोल पंपांवरही रांगा
हा कार्यभार प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी अनुभवी व कर्तव्यदक्ष नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत, सुलभा खोडके यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अविनाश मार्डीकर यांनी केली आहे.








