Gram panchayat by-elections announced for Sangrampur, Chikhli and Mehkar : रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला मतदान
Buldhana राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संग्रामपूर, चिखली व मेहकर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश असून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संग्रामपूर तालुक्यात मारोडा (प्रभाग क्र. 3 – अनुसूचित जमाती), धामणगाव (प्रभाग क्र. 2 – ना.मा.प्र. प्रवर्ग) तसेच वकाणा (प्रभाग क्र. 2 – ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण) या ठिकाणी एकूण चार सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे.
मेहकर तालुक्यात पारडा, पेनटाकळी, वाग्देव व दुर्गबोरी या चार ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी मतदान होणार आहे. चिखली तालुक्यात थेट सरपंच पदासाठी कव्हळा (ना.मा.प्र.), कोनड (ना.मा.प्र./स्त्री) व किन्ही सवडत (अनुसूचित जमाती) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच सदस्य पदांसाठी किन्हीनाईक (प्रभाग क्र. 1 व 3 – अनुसूचित जमाती महिला) व बोरगाव वसु (अनुसूचित जाती) येथे निवडणूक होणार आहे.
OBC census : ओबीसींची अचूक संख्या समोर येत नाही, तोपर्यंत हक्क मिळणार नाहीत
निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 7 ते 13 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जातील. 15 एप्रिल रोजी छाननी होणार असून 17 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.
Action against the Deputy Secretary : शासन निर्णयात लोकप्रतिनिधींची नावे; उपसचिवावर कारवाईची मागणी
या पोटनिवडणुकांसाठी मतदान 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून, मतमोजणी 29 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.








