The members who went on a trip in election time will return on Friday : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 24 जानेवारीला
Gondia जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. २४) निवडणूक होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपच्या सर्व ३१ सदस्यांना बुधवारी (दि. २२) पर्यटनासाठी पाठविण्यात आले. हे सर्व सदस्य शुक्रवारी परत येणार असल्याची माहिती आहे.
सर्व सदस्य शुक्रवारी निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषदेत हजर राहतील.
विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, विषयी समिती सभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जानेवारी रोजी निवडणूक जाहीर केली आहे. निवडणुकीस दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Educational Quality Conference : शिक्षकांचे काम म्हणजे उद्योगधंदा नाही !
जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. तर या निवडणुकीतसुद्धा अडीच वर्षांपूर्वीचेच सूत्र कायम राहणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस ८, काँग्रेस १३, अपक्ष १, चावी संघटना ४ असे समीकरण आहे. चावी संघटना आता भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपचे जिल्हा परिषदेतील बळ वाढले असून, स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची क्षमता आहे.
मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर विचारविनिमय झाल्यानंतर भाजपने सर्व सदस्यांना दोन दिवसांच्या पर्यटनावर पाठविले. अध्यक्षाच्या निवडीदरम्यान कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून ही काळजी घेतल्याचे बोलले जाते. हे सर्व सदस्य शुक्रवारी थेट जि. प. मध्ये दाखल घेऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लावायची यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. याला भाजपच्या सर्व सदस्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. पण २४ जानेवारीपूर्वी हे नाव उघड करू नका, अशा सूचना सर्व सदस्यांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
Ladki Bahin : या ‘२९’ महिलांसाठी सत्ताधारी नाहीत ‘लाडके भाऊ’!
जिल्हा परिषदेच्या दोन विद्यमान पदाधिकाऱ्यांची पुन्हा अडीच वर्षे पदावर आरूढ होण्याची इच्छा आहे. ती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात यावर ते पुन्हा येणार की शांत बसणार याचे गणित अवलंबून आहे.