Breaking

Gondia police : शिवमहापुराण कथा समारोप कार्यक्रमात खुनाचा प्रयत्न!

Attempted murder on last day of Shiv Mahapuran Katha : बरबसपुरा येथील घटना, सहा जणांवर गुन्हा दाखल

Gondia ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बरबसपुरा येथील शिवमहापुराण कथा कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात चाकूने मारून एकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेसंदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवमहापुराण कथा सुरू असताना हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

झेमेंद्र भोजराज नागपुरे (३८, रा. बरबसपुरा, ता. गोंदिया), असे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बरबसपुरा येथे तामेंद्र भोजराज नागपुरे यांच्या घराच्या बाजूला शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या महाप्रसादाकरिता मंडपात जेवण्याकरिता टेबल लावण्यात आले होते. या जेवणाच्या टेबलावर गावातील दोन-तीन लहान मुले महाप्रसाद वाटप करीत असताना आरोपी मिथुन इंद्रपाल दमाहे (२८) याने त्या मुलांना मारहाण केली. लहान मुलांना मारहाण का करतोस, असे विचारणाऱ्या झमेंद्र भोजलाल नागपुरे यांना तू मधात बोलणारा कोण म्हटले. आणि त्यांना पकडून चाकूने डोक्यावर मारून खुनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Bank Investment case: माजी उपमहापौर रवींद्र भोयर यांना अटक

या घटनेसंदर्भात आरोपी मिथुन इंद्रपाल दमाहे (२८), इंद्रपाल रूपलाल दमाहे (५०), भवरलाल साहेबलाल दमाहे (३८), कांतीलाल इंद्रपाल दमाहे (२०) , संतोष श्रीराम मस्करे (२७) व सुदर्शन मेवालाल मच्छीरके (२५, सर्व रा. बरबसपुरा) यांच्यावर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५१, (२) (३), ३५२, १८९ (४), १९०, १९१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक महेर करीत आहेत.