Brought diesel filled in a 200-litre tank : चिखलीत नियम धाब्यावर, आदेशाला केराची टोपली; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल
Chikhli सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या भीतीचा गैरफायदा घेत चिखलीत काही पेट्रोलपंप चालकांनी नियमांची उघडपणे पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट बंदी घातलेली असतानाही कॅन, बाटल्या आणि मोठ्या टाक्यांमध्ये सर्रास डिझेल विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिखली येथील रेणुका पेट्रोलपंपावर तर नियमबाह्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्याचे चित्र दिसले. एका चारचाकी वाहनामध्ये थेट २०० लिटर क्षमतेच्या टाकीत डिझेल भरून देण्यात आल्याची घटना घडली. एवढेच नव्हे, तर २५ ते ३० लिटर क्षमतेचे कॅन घेऊन उभ्या असलेल्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर इंधन पुरवले जात असल्याचे दिसून आले. परिणामी, सर्वसामान्य वाहनधारकांना पेट्रोल-डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दरम्यान, २६ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार खुल्या कॅन, बाटल्या किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. नियम मोडणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२ तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत असल्याने प्रशासनाची अंमलबजावणी यंत्रणा किती प्रभावी आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.
https://sattavedh.com/nagpur-municipal-corporation-nmc-review-meeting-will-be-held-at-nitin-gadkari-residence-on-sunday-29-marc
इंधन टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डिझेल साठवण्यास सुरुवात केली असून, ही साठेबाजी भविष्यात चढ्या दराने विक्रीसाठी असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका शेतकरी आणि शक्यता आहे.
यासोबतच, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इंधनाची असुरक्षित साठवणूक केल्यामुळे दुर्घटनेचा धोका वाढला आहे. तरीही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.








